बॅडमिंटन स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाचे यश

0

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या संघाने १९ वर्षे वयोगटात यश प्राप्त केले आहे. विजेत्या संघाने नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचा २-१ असा पराभव करून विजय संपादन केला. श्रद्धा चोप्रा, अनुष्का खेडेकर, ऋचा खेडेकर, काजल जाधव आणि दुर्वा केळकर यांचा विजयी संघात समावेश होता. तसेच मुलांचा संघही तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी होऊन जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या विशाखा सकपाळ, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. अनिल उरुणकर, क्रीडा शिक्षिका लीना घाडीगावकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here