…तर जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्याला शिवसेनेचा विरोध असेल : वैभव नाईक

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्वीटवरुन राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यांच्या या वक्तव्यावर वैभव नाईक यांनाही शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर चुकीचं वक्तव्य केलं असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. कणकवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार नाईक वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आदराचे स्थान आहे. त्यांच्या विचारांवरच आम्ही काम करत आहोत. त्यामुळे छत्रपतींबाबत आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य केले असेल तर शिवसेनेचा त्या वक्तव्याला विरोध असेल.

भाजपने आंगणेवाडीत घेतेलेल्या आनंद मेळावा भाविकांना मनस्ताप देण्यासाठी होता की नारायण राणे यांना राजकीयदृष्ट्या निरोप देण्यासाठी होता. अशी टीका भाजपवर वैभव नाईक यांनी केली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका करण्याचे काम केलं गेलं. कुठल्याही प्रकल्पाची घोषणा केली नाही, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्याचे त्यांनी काम केलं.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जिवे मारण्याची धमकीवर आमदार वैभव नाईक यांनी अश्या धमक्या देणारे खूप जण आले. मात्र त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हिंमत नाही. नितीन देशमुख यांना हे माहिती नाही. त्यांच्या धमकींना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही वैभव नाईक म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट काय होतं?
हे सगळे समजायला अक्कल लागते .. औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार .. जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही .. झाकली मूठ सव्वालाखाची, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. या ट्वीटनंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. सोशल मीडियावरही दोन गट तयार झाले आहेत..

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 06-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here