मुंबई : वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची तयारी मुंबई महापालिकेने केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जून महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्ती केली आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने वानखडे स्टेडियममध्ये क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची तयारी केली आहे. याबाबत आयुक्तांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्रही लिहिलेले आहे. यामध्ये वानखेडे स्टेडियमवर कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी कोविड -१९ रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा मागितली आहे. याबाबत एमसीएला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार येथे ५०० खाटांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:25 AM 16-May-20
