रत्नागिरी : जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी तपासणी नाका येथे कोरोना हॉटस्पॉट भागातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी होत असल्याने या परिसरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेत ह्या संपुर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. खेड नगरपालिका आणि ज्युनिअर चेंबर्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये अडकून पडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना आता काही अटी आणि शर्थींवर कोकणात येण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या कमालीची वाढली आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे यासारख्या कोरोना हॉटस्पॉट शहरातून येणाऱ्या चाकरमान्यांना कशेडी तपासणी नाका येथे थांबवून त्यांची तपासणी केली जाते. ही प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी खुप वेळ लागत असल्याने या ठिकाणी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादर्भाव असलेल्या शहरांमधून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे या परिसरात कोरोनाच्या विषाणुंचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ह्या संपुर्ण परिसराचे निर्जतुकीकरण करण्यात आले.
