रत्नागिरी : जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच असल्याने क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून लक्षणे नसलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 2 हजार 167 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस होम क्वारंटाईन करण्यात येणाऱ्यांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 6 हजार 850 आहे. तर एका दिवसात 2 हजार 167 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 698 आहे.
