देवरूखात विश्वकर्मा जयंती साजरी

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे विराट विश्वकर्मा पांचाळ समाज मंडळातर्फे विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.

यानिमित्त श्री विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन, महाप्रसाद, भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवरूखातील शिवाजी चौक मातृमंदिर चौक माणिक चौक बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय तहसील कार्यालय व परत अशी प्रभू प्रतिमा व पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. लेझीमच्या तालावर महिलांनी ठेका धरला होता.

या कार्यक्रमाला माजी आमदार सुभाष बने, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, अभिजीत शेट्ये, मुकुंद जोशी, अवधूत मेस्त्री, राजेश मोगरोणकर, सुरेंद्र पांचाळ, महेंद्र नांदळजकर, विजय आंबवकर, अनिल नांदळजकर, विजय पांचाळ, शेखर पांचाळ, धर्मेंद शर्मा, आर्या मेस्त्री, समीक्षा मेस्त्री, अविनाश मेस्त्री उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 07-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here