सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातर्फे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट देण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. केंद्र आणि राज्य शासन कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवत आहे. महिनाभर नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने खासदार विनायक राऊत यांनी स्पेशल क्वालिटीच्या पीपीई किट उपलब्ध केल्या आहेत. शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय पडते, जि.प. सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, दोडामार्ग तालुका पंचायत समिती सभापती संजना कोरगावकर, दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीफे यांच्याकडे या किटस गुरूवारी सुपूर्त करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. संदेश कांबळी उपस्थित होते.
