मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ वाढला

मुंबईशी जवळीक असलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून चाकरमान्यांचा ओघ वाढल्याने व नव्याने आढळणारे बहुतांश करोनाबाधित रुग्ण मुंबईतून गावी परतलेले असल्याने दोन्ही जिल्ह्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. रत्नागिरीत करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी करोनाच्या ५ नवीन रुग्णांची भर पडल्याने आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२वर जाऊन पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here