वॉशिंग्टन : भारताची लोकसंख्या आणि रुग्णालयात उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्स यांची संख्या यामध्ये बरीचशी तफावत आहे. त्यामुळे भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटर्सची कमी जाणवत आहे. यासाठी आता अमेरिकेने भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्याचा पुढाकार घेतला आहे. तर याची अधिकृत माहिती अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका आमच्या मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येवून या अदृश्य शत्रूचा पराभव करु” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
