मे च्या पहिल्या दहा दिवसांत आंब्याची 2,235 मेट्रीक टन निर्यात

रत्नागिरी : यावर्षी कोरोनामुळे इतर व्यावसायिकांप्रमाणे आंबा व्यावसायिकही अडचणीत आला. यंदा हंगामाच्या सुरवातीला कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा निर्यातीला एक महिना उशिर झाला. एप्रिल मध्ये गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केच निर्यात झाली. त्यानंतर 1 ते 10 मे या दहा दिवसात 2,235 मेट्रीक टन आंबा निर्यात झाली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश निर्यातदारांनी मिळवले. या वर्षी जपान, दक्षिण कोरीया, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरीका आदि देशांना आंबा निर्यात हवाई वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने सुरू झालेली नाही. तथापि मध्य-पुर्वेतील देश, जर्मनी, हाँगकाँग, इटली, नेदरलँन्ड, सिंगापूर, स्वित्झर्लंड, इंग्लंड या देशांमध्ये आंब्याची निर्यात सुरू आहे. गतवर्षी 1 एप्रिल ते 10 मे 2019 या कालावधीत 14 हजार 727 मेट्रीक टन आंबा निर्यात झाला होता. तर 1 एप्रिल ते 10 मे 2020 या कालावधीत आंबा निर्यात 6 हजार 353 मेट्रीक टन आंबा निर्यात झाला. कोरोनामुळे काही देशांमध्ये अद्यापही वाहतूक व्यवस्था सुरळीत नाही. तसेच कोरोनाच्या भितीमुळे ग्राहकांवर मर्यादा आहेत. त्याचा परिणाम आंब्याच्या विक्रीवर होत आहे. त्यातून मार्ग काढण्यात पणन मंडळाला यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here