रत्नागिरी : दि १ ते ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पुणे, बालेवाडी क्रीडासंकुल येथे नुकत्याच झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडून जलतरण व मॉडर्न पेंटथलोन (बॅथले )या दोन क्रीडा प्रकारात कोल्हापूर विभागातून रत्नागिरी गोगटे जोगळेकर कॉलेज ची विद्यार्थिनी कु. तनया महेश मिलके हिने १९ वर्षाखालील वयोगतामध्ये निवड झाली होती व त्यामध्ये मॉडर्न पेंटथलोन या क्रीडाप्रकारामध्ये १९ वर्षाखालील मुली या वयोगटात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक घेऊन सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहेत, तसेच १९ वर्षाखालील मुलींच्या जलतरण क्रीडाप्रकारात ५० मी ब्रेस्टस्ट्रोक या अतिशय वेगवान खेळात द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक प्राप्त केलेले आहे व अश्या दुहेरी खेळात पदक प्राप्त करणारी हि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
तिच्या या यशामध्ये तिचे मार्गदर्शक श्री. महेश मिलके, सौ. गौरी मिलके तसेच गोगटे जोगळेकर विद्यालयातून प्राचार्य, क्रीडाशिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच तनयाला जिल्हाधिकारी श्री. देवेंदर सिंग, व, रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 08-02-2023
