राज्यातील अंगणवाडी सेविकांचा येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप

0

पुणे : राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत सेवासमाप्ती लाभ द्यावेत, मासिक निवृत्तिवेतन सुरु करावे, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.

HTML tutorial

या कृती समितीच्या सदस्या शुभा शमीम, कमल परुळेकर, जयश्री पाटील, एम, ए. पाटील आदी सदस्यांनी या निर्णयाची घोषणा केली.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक आयोजित केली होती. मोबाईल रिचार्जची थकीत देयके देण्यात यावीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळाव्यात, वाढलेल्या लोकसंख्येसाठी नवीन अंगणवाडी सुरु करावी, मानधनामध्ये सेवेच्या अवधीनुसार ३१ व ६३ रुपये आणि ३,४,५ टक्के वाढ द्यावी, जादा पदभाराचा अतिरिक्त मेहनताना, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, विविध विमा योजनांचा लाभ, इंधन व आहार दरात वाढ करावी, आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. परंतु अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 08-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here