जगभर कोरोनाचा कहर ….

जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3,08,645 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 46 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 46,28,724 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 17,59,589 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 88,507 बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 31 हजार 610 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 27 हजार 459 वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 27 हजार 529 जणांचा तर ब्रिटनमध्ये 33 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here