एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता

0

बिग बॉस-16 च्या विजेत्याची घोषणा झालेली आहे. एमसी स्टॅन हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे.

एमसी स्टॅन हा बिग बॉस-16 चा विजेता ठरल्यानं आता त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे एमसी स्टॅनचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

शालीन भनोट, अर्चना गौतम, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियांका चहर चौधरी हे बिग बॉस-16 चे टॉप-5 स्पर्धक होते. यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅनच्या बिग बॉस-16 च्या घरातील डायलॉग्सला तसेच त्याच्या हटके स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एमसी स्टॅन हा पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. वाटा या गाण्यामुळे स्टॅनला विशेष लोकप्रियता मिळाली.

बिग बॉस-16 च्या विजेता एमसी स्टॅनला कलर्सच्या आयकॉनची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीवर गोल्ड युनिकॉर्नचा लोगो आहे. तसेच विजेत्याला ग्रँड आय 10 निओस ही गाडी देखील मिळणार आहे, असंही म्हटलं जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 13-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here