पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी आमदार शेखर निकम स्टार प्रचारक

0

चिपळूण : पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी चिपळूण- संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक केली आहे.

आ. निकम यांना या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी पक्षाकडून संधी दिल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या विजयासाठी केंद्रीय नेते व मंत्री यांच्यासह स्टार प्रचारकांची जुळवाजुळव करण्यात आली आहे.

दोन्ही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होत आहे. पैकी एका विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे तेथे तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, पोटनिवडणुकीतील विजय हा सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी स्टार प्रचारक रिंगणात उतरले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचाराकरिता आमदार शेखर निकम यांना स्टार प्रचारक म्हणून पक्षाने जबाबदारी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 13-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here