जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 92 वर

रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे आणखी सहा रूग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 92 वर पोहचली आहे. रविवारी 270 तपासणी अहवाल मिरज येथून प्राप्त झाले यापैकी 264 अहवाल निगेटिव्ह आहेत उर्वरित सहा अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये कळंबणी येथील एक व दापोली येथील पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पाच पॉझिटिव्ह अहवालातील एक रुग्ण मुरडव येथील असून चार रुग्ण कोंडे शिवगण या गावातील तर एक रुग्ण कोलतर कोंड या गावातील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here