खेडशी येथे आज डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

रत्नागिरी : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे ठिकठिकाणी राबविला जात आहे. खेडशी येथे आज (दि. १८ मे) हा उपक्रम आणि मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. खेडशीच्या नव्या वसाहतीत श्रीनगर येथे सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत आणि महालक्ष्मी मंदिरानजीक मुख्याध्यापक भवनात दुपारी दीड ते सायंकाळी पाच या वेळेत उपस्थित राहणाऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधेही मोफत दिली जाणार आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोफत होमिओपॅथिक गोळ्या यावेळी दिल्या जाणार आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here