अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार आमदारकीची शपथ

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांना आज सोमवारी सदस्यत्वाची शपथ दिली जाणार आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर दुपारी एक वाजता विधानभवनात या सदस्यांना शपथ देतील. या नऊ सदस्यांमध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपचे रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here