नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमधील कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत होतो. मात्र याबाबतचा विरोध बाजूला करत स्थानिकांनी रद्द झालेल्या कलम 370 निर्णयाचा स्विकार केल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी असणाऱ्या ईदच्या निमत्ताने पुन्हा एकदा परिसरात असणाऱ्या स्थानिक बाजारपेठा खुल्या आहेत. व्यापाराच्या निमित्ताने नागरिक दैनंदिन व्यवहारात लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यात या वर्षी स्वातंत्र्याची ईद साजरा करण्यात येईल. सर्व जण ईदच्या तयारीला लागले आहेत. सर्वांनीच निडरपणे ईद सादरा करावी, अशी प्रतिक्रिया राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे शनिवारी अनंतनाग येथे पोहोचले. ज्या ठिकाणी त्यांनी शालेय मुलांची भेट घेतली.
