भारतीय वंशाच्या निक्की लढवणार अमेरिका अध्यक्षपदाची निवडणूक

0

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या निक्की हेली २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होऊ शकतात. निक्की यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत २०२४च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी औपचारिकपणे उमेदवारी जाहीर केली आहे.

५१ वर्षीय निक्की रंधावा हेली या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्या असून त्या दक्षिण कॅरोलिना राज्याच्या राज्यपाल होत्या. निक्की म्हणाल्या की, मी निक्की हेली असून, अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरली आहे.

रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यापूर्वी निक्की यांना दोन टप्प्यातील निवडणूक जिंकावी लागणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले आहे की, त्यांना २०२४ मध्ये उमेदवार व्हायचे आहे. आणखी काही लोक अध्यक्षपदाच्या शर्यतीत येऊ शकतात. मात्र, मुख्य लढत ट्रम्प आणि हेली यांच्यातच होणार असल्याचे मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीच्या वेळापत्रकात दक्षिण कॅरोलिना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

निक्की नेमके काय म्हणाल्या?
हेली यांनी व्हिडीओमध्ये म्हटले की, हीच वेळ आहे, जेव्हा नवीन पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळायला हवी. आपल्याला आपली अर्थव्यवस्था निश्चित करायची आहे, आपल्या सीमा सुरक्षित करायच्या आहेत आणि शेवटी हा देश पूर्वीपेक्षा मजबूत बनवायचा आहे. हेच आमचे ध्येय आणि अभिमान आहे.

आतापर्यंतची कामगिरी
यूएनमध्ये अमेरिकेच्या राजदूत
दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदाची निवडणूक दोनदा जिंकली
२०११ मध्ये पहिल्यांदा राज्यपाल झाल्या तेव्हा त्या ३९ वर्षांच्या होत्या.
दक्षिण कॅरोलिना राज्याची पहिली महिला गव्हर्नर होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
अमेरिकेच्या सर्वात तरुण गव्हर्नर होत्या.

भारताशी नाते कसे?
निक्की यांचे वडील अजित सिंग रंधावा हे पंजाबमधील तरनतारणचे रहिवासी आहेत. अजित सिंह पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक तर आई राज रंधवा यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती.
१९६० च्या दशकात निक्की यांचे कुटुंब दक्षिण कॅरोलिनामध्ये राहू लागले. निम्रत म्हणजेच निक्कीने १९९६ मध्ये मायकल हेली नावाच्या अमेरिकन व्यक्तीशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

निक्की यांच्या आधी फक्त ट्रम्प यांनी २०२४ मध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. निक्की यांच्यामुळे ट्रम्प यांना आव्हान निर्माण झाले आहे.

आणखी कोण स्पर्धेमध्ये?

माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स
फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसेंटिस
लिझ चेनी आणि माईक पॉम्पीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here