मुंबईत निवासी इमारतीला भीषण आग

मुंबई : मुंबईतील माझगावमधील सेंट मेरी रोडवरील एका निवासी इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलानं दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, सातव्या मजल्यावर सात जण अडकले असून, ते सुरक्षित ठिकाणी असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. माझगावमधील सेंट मेरी रोडवरील एका निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये आज दुपारी १२.२२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ही तळमजला अधिक सात मजली इमारत आहे. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे कर्मचारी अवघ्या दहा ते बारा मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. चार अग्निशमन बंब, एक रुग्णवाहिका त्यांच्यासोबत होती. त्यांनी बचावकार्य हाती घेतलं. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदले यांनी सांगितलं की, आतापर्यंत दोन नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. पाचव्या मजल्यावरून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून, सात जण अद्याप सातव्या मजल्यावर अडकलेले आहेत. ते सुरक्षित जागी आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:15 PM 18-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here