पावसाळ्यापूर्वी कोरोना संकट संपवायचं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात 18 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या लॉकडाऊनदरम्यान रेड झोन, कन्टेंन्मेट झोन वगळता इतर भागात काही उद्योग, दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल करण्यात येतील. या चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आपण कोरोनाविरोधातील हे युद्ध लढून जिंकणारच असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वी आपल्याला करोनाचे संकट संपवायचे आहे, असे स्पष्ट करताना उद्योग धंद्यांबाबत आपण तारेवरची कसरत करत आहोत. राज्यात पन्नास हजार उद्योग सुरू करण्यास परवाने दिले आहेत. पाच लाख मजूर कामावर रुजू झाले आहेत. सत्तर हजार उद्योगांना परवाने दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. ठाकरे म्हणाले की, सरकारच्या सूचना या गतीरोधक आहेत. काहीकाही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. कोणतीही गोष्टी सुरू करण्यापूर्वी जनतेला माहिती दिलेली आहे. एखादी गोष्टी सुरू केल्यानंतर ते सुरूच राहीले पाहीजे. काहींच्या परीक्षा राहिल्या आहेत, शाळा कशा सुरू करणार. ऑनलाईन करणार का नाही, हे मोठे विषय आहेत, शाळा सुरू कशा करायच्या, याचा विचार सुरू आहे. हे संकट पावसाळ्यापूर्वी संपावयचे आहे. आपल्यासमोर दोन मोठे आव्हाने आहेत. ग्रीन झोन आपल्याला करोनामुक्त ठेवायचे आहे. नवीन रुग्ण वाढू द्यायचे नाही. रेड झोन लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये आणायचा आहे. ग्रीन झोनमध्ये जिथे जिथे परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी कामगारांची गरज भासणार आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना आव्हान करतो की, त्यांनी या संधीचा फायदा घ्या. जिथे जिथे ग्रीन झोन आहे, तुम्ही आत्मनिष्ठेने बाहेर पडून पुढे या. आत्मनिर्भर व्हा. महाराष्ट्र उभा करू. जगासमोर आदर्श उभे करू. भूमिपुत्रांनो पुढे या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
आयसीयु बेड्सची सुविधा आपण सुरू करत आहोत. ही आरोग्य सुविधा वाढवत नेत आहोत. अडीच लाख बेडस् सज्ज ठेवले आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने बेड मिळत नाही. पुढच्या महिन्यात किती रुग्ण होतील, याची काळजी घेऊन उपाययोजना करत आहोत. ज्यांची ज्यांची कोविड योद्धा म्हणून काम करण्याची इच्छा असेल त्यांनी पुढे यावे. महाराष्ट्रात सद्यस्थितीला रुग्णसंख्या अधिक असली तर अनेकजण बरे होत आहेत. वेळत उपचारासाठी आले तर ते बरे होवून घरी जावू शकतात. रेड झोनमधील उद्योग सुरू झाले तर साथीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढेल. सध्या हे संकट मंदावून ठेवत आहेत. हळुहळु आपण वेगवेगळे क्षेत्र सुरू करत आहोत, असे ठाकरे म्हणाले. घाई करू नका. अस्वस्थ होऊन गावी जाण्याची घाई करू नका. करोनासोबत जगायला शिका असे अनेकजण सांगत आहेत. घरात रहा, सुरक्षित रहा. घराबाहेर राहताना सुरक्षित रहा. किती काळ हा विषाणु जीवंत राहीले हे सांगता येत नाही. या गोष्टी घेऊन पुढे काही दिवस सावध राहावे लागणार नाही. इतके दिवस जी शिस्त पाळली आहे. ती यापुढे कायम ठेवा. धार्मिक सण, उत्सव यांना आपण परवानगी दिलेली नाही. दोन हात दूर राहून आपल्याला राहयचे आहे. जोपर्यंत तुमचा -माझ्यात विश्वासाचा धागा आहे, तोपर्यंत हे संकट आपण परतून लावणार आहोत. आपल्याला जनजीवन पुन्हा रुळावर आणायचे आहे. महाराष्ट्राला धोका होऊ नये, यासाठी हे कठोर पावले उचलली जात आहेत. हे केवळ आपल्या हितासाठी आहे. यापुढे सरकारला सहकार्य करा. ही साखळी तोडून करोनामुक्त होऊ, ‘ घरात राहा, सुरक्षित राहा,घराबाहेर राहताना सावध राहा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोकणवासियांना आवाहन
मुंबईतून कोकण,प. महाराष्ट्रात गावी जाण्याची अनेकांची इच्छा आहे पण खरेच जाणे गरजेचे आहे का याचा विचार करा, आपल्यामुळे आपल्या गावी असलेल्या आप्तेष्टांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या. गावी जाण्याची घाई न करणे हे आपल्या आप्तेष्टांवर व राज्यावर आपले उपकार असतील. रस्त्याने चालत जाण्याची काहीही गरज नाही. योग्यवेळी आपल्याला गावी पोहोचवण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तूर्त अधीर होऊ नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here