महिमतगडावर उद्या शिवजन्मोत्सव सोहळा

0

देवरुख : निगुडवाडी (ता. संगमेश्वर) येथील महिमतगडावर दुर्गवीर प्रतिष्ठान व समस्त शिवप्रेमींतर्फे १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

त्यानिमित्ताने सकाळी देवरुख ते किल्ले महिमतगड पायथा अशी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर गड परिसरात श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. तसेच पालखी मिरवणूक, महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, गडदेवता महिषासुरमर्दिनीचे पूजन केले जाणार आहे.

रविवारी रात्री मशाल महोत्सव व दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. सहभागासाठी प्रशांत डिंगणकर, मनीष सावंत, निशांत जाखी, अजय सावंत, राजेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 18-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here