आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रद्धा बोडेकर सन्मानित

0

रत्नागिरी : मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा जिल्हास्तरीय कै. बळीराम परकर आदर्श शिक्षक पुरस्कार पटवर्धन हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका श्रद्धा राजन बोडेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सौ. बोडेकर यांना शाल, श्रीफळ, गौरव पत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली.

१८ फेब्रुवारी रोजी मालगुंड येथे बळीराम परकर महाविद्यालयाच्या सभागृहात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर, सचिव विनायक राऊत, संचालक व केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन उर्फ आबा पाटील, सरपंच श्वेता खेऊर, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

श्रद्धा राजन बोडेकर या पटवर्धन हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. दैनंदिन शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातही त्यांचे उत्तम योगदान आहे. चाकोरी बाहेर जाऊन कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रतिवर्षी या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनीही आपल्या मनोगतामध्ये श्रद्धा बोडेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच यावेळी आदर्श शेतकरी पुरस्कार श्री विनोद दत्ताराम बारगुडे व आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार कादंबरी चौधरी यांना प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी संस्थेचे सचिव विनायक राऊत यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 20-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here