कोल्हापूर | सांगली-कोल्हापूरच्या पूरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान झालं आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराजांची नगरी ‘करवीरनगरी’ अर्थात कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी असलेल्या बकरी ईदला बकरी न कापता ते पूरग्रस्तांना आर्थिक मदत देणार आहेत.शेतकरीवर्गाचे हाल झालेले आहेत, मुक्या प्राण्यांची वाताहात झालेली आहे. लाखो लोक बेघर झालेले आहेत. पूरग्रस्तांच्या अडचणी या पूर ओसरल्यानंतर अधिकच वाढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने मदतीचे आवाहन केले होते. लोकांनीही या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. पैगंबर मोहम्मद यांनी म्हटले आहे की आपल्या शेजारच्या घरात जर अन्न शिजत नसेल व तर आपले घरातील अन्न हे पहिल्यादा त्या घरात दिले पाहिजे…तो कोणत्याही धर्माचा वा जातीचा असू दे…तर चला आपण आपल्या बांधवाची मदत करू, अशा आशचायं पत्रक मुस्लिम समाजाने काढलं आहे. दरम्यान, मुस्लिम समाजाने घेतलेल्या निर्णयाचं राज्यभरातून कौतुक होत आहे.
