अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्या,जमिनीला भेगा पडल्या,तर पुरात भातशेती पाण्याखाली गेली,बाजारपेठेत शिरलेल्या पुराने दुकानांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ गावातील सरंबळ गावात दुचाकीवरून जाऊन पाहणी केली. कुडाळ,सावंतवाडीत पावसाने थैमान घातले. पुरात अनेक रस्ते वाहून गेलेत तर काही रस्त्यांना तडे गेले आहेत.शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी पूरग्रस्त भागाची पहाणी केली.ज्याठिकाणी चारचाकी जात नाही अशा गावात दुचाकीवरून जाऊन खासदार विनायक राऊत यांनी पहाणी केली. पूरग्रस्तांशी भेट घेत त्यांचे सांत्वन करत शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचनाही राऊत यांनी केल्या.
