लेख : दुसरी वेळ…

0

लेखक : साहिल अजित चरकरी
गोळवली, ता. संगमेश्वर
मोबा. ८६००८४३१६८

खर तर  लेख लिहिण्याची ही माझी पहिली वेळ. title जरी दुसरी वेळ असलं तरी माझी ही पहिलीच वेळ आणि कोणत्याही गोष्टीची पहिली वेळ ही आपल्यासाठी खूपच महत्वाची असते.म्हणूनच खूप गमतीशीर पण विचार करायला लावणारा अश्या विषयावर मी लिहायचं ठरवलंय.    आपण आपल्या आयुष्यात पहिल्या वेळेला खूप महत्व देतो.अस म्हटलं जातं की first impression is last impression. पण खरचं आपण पहिल्या वेळेत एखाद्या बद्दल सर्व जाणून घेऊ शकतो का?किंवा आपण त्या व्यक्ती किंवा गोष्टीबद्दल पहिल्या भेटीतच मत बनवून मोकळे होतो ते मत योग्य असत का? उदाहरण द्यायचं झालंच तर एखादा पदार्थ जेव्हा आपण पहिल्यांदा खातो तेव्हा तो आपल्याला आवडत नाही मग आपण अस ठरवतो की हा पदार्थ खूप वाईट आणि बेचव आहे आणि परत जेव्हा तो आपल्या समोर येतो तेव्हा आपण त्याची चव न घेताच आधीच्याअनुभवावरून तो बेचवच असणार अस ठरवून मोकळं होतो. पण आपण हा विचार करत नाही की कदाचित पहिल्या वेळेस त्या पदार्थाची चव आचाऱ्यामुळे खराब झाली असावी किंवा आपल्याला तोंड आलं असल्यामुळे सगळेच पदार्थ बेचव लागत असतील .पण ह्या सगळ्याचा विचार न करता आपण त्या पदार्थाला दोष देऊन मोकळे होतो.म्हणून मला असं वाटत की प्रत्येक गोष्टीची ‘दुसरी वेळ’ आपल्या आयुष्यात येऊ द्यावी.पण पहिल्या वेळेस आलेल्या वाईट अनुभवावरून आपण ती दुसरी वेळ आपल्या आयुष्यात येऊच देत नाही किंवा आली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.   दुसरं एक उदाहरण आपण बघूया म्हणजे मला नक्की काय म्हणायचं आहे हे सर्वांना अगदी सहजपणे समजू शकेल.सध्या प्रेम हा सर्वांच्या जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. आपण जरा तरुण झालो की आपल्याला प्रेमाची स्वप्ने पडू लागतात.अस म्हटलं जातं की पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. तिची आणि त्याची ही प्रेमात पडण्याची पहिलीच वेळ होती.ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे(अस त्यांच म्हणणं होतं)पहिल्या प्रेमाची गाणी दोघांनीही गायिली होती,दोघेही पावसात चिंब भिजले होते,दोघांनीही एकत्र movie बघितला होता, जवळ जवळ शहरातली सगळीच गार्डन आणि गार्डन मधले प्रत्येक कोपरे त्यांना माहीत झाले होते, फोनवर जास्त वेळ बोलताना कोणती काळजी घेतली पाहिजे ह्यावर तर त्यांची PHD झाली होती. थोडक्यात त्या दोघांच्या मनात असलेल्या प्रेमाच्या व्याख्खेनुसार दोघेही जगत होते. ती त्याच्यासाठी चंद्र आणि तो तिच्यासाठी राजकुमार होता. दोघेही एकमेकांसाठी काहीही करायला तयार होते. लग्न झाल्यानंतर घराचा रंग कोणता असावा इथपासून ते मुलं झाल्यावर त्यांची नावं काय ठेवायची इथपर्यंत त्यांचं सगळं ठरलं होतं. दोघांनाही एकमेकांनाभेटल्याशिवाय चैन पडत नव्हती. दिवसभर भेटता नाही आलं तरी रात्री स्वप्नांत मात्र ते एकमेकांना नक्की भेटायचे.अशी ही प्रेमाची कवीता लिहिता लिहिता आता त्यांचं प्रेम एका वर्षाच झालं होतं.पण का कुणास ठाऊक पहिल्यासारखं आता काहीच होत नव्हतं. सतत भांडण व्हायचं,मग त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यांचं ब्रेकअप झालं(कारण mention करत नाही कारण विषयाला फाटे फुटतील)great अश्या वाटणाऱ्या love story चा the end झाला. दोघांनाही एकमेकांबद्दल तिरस्कार वाटत होता. प्रेम वैगरे काही नसतंच अशी त्यांची धारणा झाली होती.त्याला प्रेम वैगरे ह्या गोष्टी फ़क्त time पास साठी असतात असं वाटत होत. तिने तर आयुष्यात प्रेम करणारच नाही असं ठरवलं. आणि सर्व मुलं सारखीच असतात असं ठरवून मोकळी झाली आणि स्वतःला आलेल्या अनुभवावरून तिने आपल्या मैत्रिणींना आणि त्याने आपल्या मित्रांना सावध केलं.     आता वरील उदाहरणावरून लक्ष्यात येत की त्या दोघांनाही पहिल्या वेळेस प्रेमाचा खुपच वाईट अनुभव आला म्हणून त्यांनी प्रेम वाईटच असतं अस ठरवलं. तिने आणि त्याने परत कधीच प्रेम न करण्याचा निश्चय केला. म्हणजे ती दुसरी वेळ न येऊ देण्याचं त्यांनी ठरवलं. परंतु त्यांचं break up का झालं याचा शोध तिने किंवा त्याने घेतला नाही.कदाचित त्यांची एकमेकांच्या बाबतीतली निवड चुकली असावी किंवा प्रेमाचा खरा अर्थच त्यांना कळाला नसेल किंवा परिस्थितीच अशी आली असेल की त्यांना वेगळं व्हावं लागलं. पण ह्या सगळ्याचा विचार न करताच त्यांनी प्रेमाला दोष दिला म्हणजेच आपलं मत तयार केलं. पण तेच जर त्यांनी दुसरी वेळ येऊ दिली असती तर त्यांचं मत कदाचित बदलुही शकलं असत. त्याला हावी तशी ती आणि तिला हवा तसा तो जर भेटला असता तर त्यांचं मत बदललं असत किंवा पुन्हां एकदा वाईट अनुभव आला असता हीपण शक्यता नाकारता येत नाही.      मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण पहिल्याच भेटीत एखाद्या वक्तीचा स्वभाव असाच आहे किंवा असावा असं ठरवतो.तिला पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही त्यामुळे बहुतेक वेळेला आपला अंदाज चुकतो. आता तुम्ही म्हणाल की पहिल्या वेळेस आलेल्या अनुभवावरुन केलेल्या मताचा काही तोटा होतो का???तर निश्चितच होतो वरिल उदाहरणात तिने आणि त्याने आपल्या मित्रमैत्रिनिंणा आपला अनुभवावरून सल्ले दिले त्यामुळे कदाचित त्या गोष्टीबाबत किंवा त्या व्यक्तीबाबत त्यांची मत सुदधा चुकीची झाली असतील.तसंच प्रत्येक वेळेस पाहिल्या वेळेस वाईटच अनुभव येईल असही नाही परंतु जर आपल्याला चांगला अनुभव आला तर आपण आनंदाने दुसरी वेळ येऊ देतो शिवाय आपण वाटच बघत असतो की कधी ती दुसरी वेळ येईल. जस की आपण पाहिल्यांदा आंबा खातो आपल्याला तो खूप गोड लागतो आणि इतका आवडतो की आपण बाजारातून अजून डझनभवर आंबे घरी घेऊन येतो आणि मनसोक्त आंबे खातो.       तात्पर्य हेच की पहिल्या वेळेस आलेल्या वाईट अनुभवामुळे त्या व्यक्ती किंवा गोष्टीचे गुणधर्म न लक्ष्यात घेता त्यांना आपण वाईट ठरवून मोकळे होतो.आणि त्यातून खुपचं गैरसमज होतात, त्या व्यक्ती किंवा गोष्टीची उगाच बदनामी होती. फक्त आपलंच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचंही त्या व्यक्ती किंवा गोष्टी बाबतच मत हे अपल्यासारखच होतं. दुसरं म्हणजे  पहिल्या वेळेस आलेल्या अपयशावरून आपल्याला हे जमणारच नाही असं म्हणून आपण आपले प्रयत्न थांबवतो. पण आपल्याला अपयश का आलं ह्याची कारणं कोणीच शोधत नाही. म्हणून गरज आहे ती त्या व्यक्ती किंवा गोष्टीला नीट समजून घेऊनच तिच्याबद्दल मत तयार करण्याची जेणेकरून उगाचच होणारे गैरसमज टाळता येतील.आणि पहिल्या वेळेस आलेल्या अपयशाची कारणं शोधून यशाची शिखरं गाठता येतील. त्यासाठी गरज आहे ती “दुसरी वेळ”आपल्या आयुष्यात येऊ देण्याची.सर्वांनी नक्की विचार करा आणि ती “दुसरी वेळ” आपल्या आयुष्यात येऊ द्या आणि आली तिला घट्ट मिठी मारा कारण ती “दुसरी वेळ” तुमचं अवघ आयुष्य ,तुमचे विचार एवढंच काय तर तुमचा स्वभाव सुद्धा बदलू शकते.     जस की कोणतच statement हे सर्व परिस्थितीला लागू होतं नाही तसच ह्याला सुद्धा काही अपवाद असूच शकतात परंतु ती “दुसरी वेळ” आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here