सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या होम क्वॉरंटाइनविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : मुंबई किंवा बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना होम क्वॉरंटाइन केल्यानंतर त्यांनी घरातच थांबण्याचे आदेश आहेत. असे असतानाही हातखंबा येथे होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारलेली व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातखंबा येथील होम क्वॉरंटाइन असलेली व्यक्ती हातखंबा पोस्ट ऑफीस येथे फिरताना आढळली. सदर व्यक्ती डोंबवली (जि. ठाणे) येथून आली होती. त्यानंतर रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी करून त्यांना होम क्वॉरंटाइनचा सल्ला देण्यात आला होता. तरीदेखील ते सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे आढळून आले. ही माहिती हातखंब्याच्या सरपंच आणि ग्राम कृती दलाच्या अध्यक्ष विद्या बोंबले यांना कळल्यावर त्यांनी याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here