प्रेक्षकांविना खेळणं म्हणजे वधुशिवाय विवाह : शोएब अख्तर

कोरोना व्हायरसच्या संकटातही काही ठिकाणी हळुहळू क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांविना बुंदेसलिगा फुटबॉल सामने खेळवले जात आहेत. दोन-अडीच महिन्यानंतर जगातील क्रीडाप्रेमींना अखेर लाईव्ह स्पर्धा पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता लवकरच क्रिकेट स्पर्धाही पाहायला मिळतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. पण, त्यापूर्वी सर्व नियमांचं काटेकोर पालन होणं हेही महत्त्वाचे आहे. पण, फुटबॉल लीगप्रमाणे क्रिकेट सामनेही प्रेक्षकांविना खेळवावे लागणार आहेत. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानं अशा सामन्यांत ती मजा नसेल असं मत व्यक्त केलं. तो म्हणाला,”रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे हे क्रिकेट मंडळासाठी व्यवहार्य आणि टिकाऊ असेल, परंतु त्यानं महसूल जमा केला जाऊ शकतो, असं मला वाटत नाही. प्रेक्षकांविना खेळणं म्हणजे वधुशिवाय विवाह करणं. क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षक हवेच. या वर्षभरात कोरोनाची परिस्थिती सुधरेल, अशी आशा व्यक्त करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here