जिल्ह्यातील टँकरग्रस्त वाड्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढताच

रत्नागिरी : जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात 48 गावांमधील 88 वाड्यांना 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मागील आठवड्यात संगमेश्वर व लांजा तालुक्यात टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडली आहे. राजापूर, रत्नागिरी आणि गुहागर हे ३ तालुके टँकरमुक्त आहेत. खेड, मंडणगड, चिपळूण, दापोली या चार तालुक्यातील टँकरग्रस्त वाड्यांची संख्या स्थिर आहे; मात्र संगमेश्वरात 2 गावातील सहा वाड्यांची तर लांजा तालुक्यातील 1 गावातील सहा वाड्यांची टँकरसाठी भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here