कुडाळ तालुक्यातील पुरहानीची पाहणी

0

कुडाळ : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ तालुक्यातील चेंदवण, सरंबळ व कुडाळ डॉ. आंबेडकरनगर आदी पूरबाधित गावांना भेटी देऊन पूरहानीची प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला. पूरबाधित कुटुंबांना निर्वाह भत्त्यासह आर्थिक मदत शासनाकडून केली जाणार आहे. तरीही पूरबाधित कुटुंबांच्या मूलभूत गरजा काय आहेत, याचा सर्व्हे तत्काळ करून माहिती द्यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकारी व शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्या. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार मुसळधार पावसाने कुडाळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी पालकमंत्री केसरकर यांनी या पूरहानीची पाहणी करत आढावा घेतला. पूरबाधित घरे, शेतीची पाहणी करत आपद्ग्रस्त नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. “प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार मच्छींद्र सुकटे व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी केल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, चेंदवण सरपंच सौ. उत्तरा धुरी, कवठी सरपंच रूपेश वाडयेकर, ग्रामसेवक संतोष पालव, ग्रा. पं.सदस्या रेवती वालावलकर, शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदकर, विठ्ठल कांबळी, बाळा धुरी आदींसह मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनीही डॉ. आंबेडकरनगराला भेट देऊन पूरहानीची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here