कुवारबाव येथील चव्हाण दाम्पत्याने विहिरीत मारली उडी

0

रत्नागिरी कुवारबाव येथे आज सकाळी पती पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पती परशुराम जनार्दन चव्हाण हे मयत झाले असून पत्नी सरिता चव्हाण ही गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास माने इंटरनॅशनल स्कुल जवळ असणाऱ्या विहिरीत या दोघांनी उडी मारली. या विहिरीचे खोदाईचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने तळाला कातळ होता. त्यामुळे परशुराम चव्हाण हे कातळावर आपटून जागीच मयत झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली. परशुराम चव्हाण हे एसटीत वाहक होते व त्यांनी नुकतीच रिटायरमेंट घेतली होती. त्यांच्या घरात एक चिठ्ठी सापडल्याची माहिती मिळत आहे. चव्हाण यांचे कुवारबाव येथे चप्पल चे दुकान देखील होते. विहिरीत उडी घेतल्याची घटना कळताच कुवारबाव येथील श्री जय भैरी मित्रमंडळचे राजेश तोडणकर, सुशील आयवळे, रोहन मयेकर, अजित सावंत यांनी या दांपत्याला क्रेनच्या साहाय्याने विहिरीबाहेर काढून इस्पितळात पाठवले. सध्या जिल्हा रुग्णालयात पत्नीवर उपचार सुरू असून या आत्महत्येबाबत पोलीस तपास करीत आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here