रत्नागिरीत लोकसभेसाठी भाजपचाच उमेदवार : प्रमोद जठार

0

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने बूथ पातळीपर्यंत बांधणी केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीने ठरवून दिलेला कार्यक्रम जिल्ह्यात उत्तमरीत्या राबविला जात आहे. येणारी कोणतीही निवडणूक लढण्यास आता भाजप तयार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार लढेल व खासदार होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी व्यक्त केला तर लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोकणात सभा होणार आहे. रत्नागिरी – रायगड लोकसभा मतदारसंघात अमित शहांची होणार सभा

ही सभा रत्नागिरीत व्हावी, यासाठी आम्ही आग्रही असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.

भाजपचा लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा सुरू आहे. देशातील भाजप पदाधिकारी, खासदार, मंत्री मतदारसंघात जाऊन केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या का, हे पहात आहे. वाडी-वस्तीवर जाऊन योजना अंमलबाजवणीची खातरजमा करत असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. त्यांनी नुकताच मतदारसंघाचा दौरा केला आहे. चिपळूण येथून दौऱ्याला सुरुवात झाली. चिपळूण ते राजापूर दौरा करताना त्यांनी प्रथम चिपळूण येथे मेळावा घेतला. त्यानंतर श्री क्षेत्र पर्शुराम देवस्थानाला भेट दिली. तेथील परिसर सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहे. त्यानंतर त्यांनी वालावलकर ट्रस्टच्या रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी संर्पदंशावरील लस तयार करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत केद्रस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. मिश्रा यांनी दिल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.

जलजीवन मिशनमधून प्रत्येक घरा- घरात पाणी पोहचणार असल्याचे श्री. जठार आपत्ती निवारणअंर्तगत कामांसाठी कोकणाला केंद्र सरकारने ३ हजार कोटी रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. निवारा शेड त्यासोबतच पायभूत सुविधा या निधीतून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लांजा तालुक्यातील कोट गावात झाशीची राणी यांचे गाव दत्तक घेण्याची विनंती स्थानिक सरपंचांनी केली आहे. ती मागणी ही ना. मिश्रा यांनी मान्य करुन या गावात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतील त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजापूर हायस्कूलने त्यांची शाळा माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विकसीत केली आहे. तेथे कोकणातील सुसज्ज म्युझियम तयार करण्याच्या दृष्टीकोणातून चर्चा झाली असून केंद्र सरकारने त्यांना निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी ना. मिश्रा यांच्याकडे करण्यात आल्याचे श्री जठार यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 28-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here