‘या’ गोष्टीत निलेश राणेंचा नंबर पहिला : रोहित पवार

मुंबई : राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यातील ट्विटरवॉर संपण्याची चिन्हे दिसत नाही. साखर उद्योगावरील शरद पवारांवरील ट्विटला आमदार रोहित पवार यांनी निलेश राणेंना उत्तर दिल्यानंतर निलेश राणे यांनी रोहित पवारांवर तीव्र शब्दात टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि निलेश राणे यांच्या वादात राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी उडी घेतली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांना थेट धमकी देत त्यांना आव्हान केलं. त्यावरुन रोहित पवारांनी ट्विट करत आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो असा टोला निलेश राणेंना लगावला. त्यानंतर रोहित पवारांच्या या ट्विटला निलेश राणेंनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, बोलणाऱ्याची लायकी बघून मी उत्तर देतो धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझं काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला, अशी अप्रत्यक्षरित्या धमकी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here