संगमेश्वर येथे कोरोनाविषयक आढावा बैठक

संगमेश्वर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत मंगळवारी संगमेश्वर तालुक्याची आढावा बैठक देवरूख येथील तहसीलदार कार्यालयातील अल्पबचत हॉलमध्ये पार पडली. बैठकीत मुंबईतून येणारे चाकरमानी, त्यांची क्वारंटाइन करण्यासंदर्भात केलेली सुविधा, टेस्टिंग सुविधा इत्यादींची माहिती आ. निकम यांनी करून घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. आरोग्य सेवेबाबत काही उणिवा आहेत का, आणखी काही सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत का, याबाबतचा आढावाही त्यांनी घेतला. या बैठकीला माजी मंत्री रवींद्र माने, माजी आ. सुभाष बने, जि. प. अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, सभापती सुजित महाडिक, सौ. नेहा माने, तालुकाध्यक्ष विवेक शेरे, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, युयुत्सु आर्ते, प्रदेश चिटणीस बारक्याशेठ बने, मनसे तालुका अध्यक्ष अनुराग कोचिरकर, माजी कृषी समिती सभापती बाळूशेठ ढवळे, मोहनशेठ वनकर, शहर अध्यक्ष हनिफ हरचिकर, पंकज पुसाळकर, नीलेश भुवड, नितीन भोसले, काँग्रेस तालुका अध्यक्ष दत्ता परकर, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, मंगेश बंडागळे, राजू धामणे, सचिन मांगले, सचिन जाधव आदी लोकप्रतिनिधी आणि प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here