कोरोना पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची आज बैठक

मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकत्रितरित्या राज्यातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. कोरोना साथीचे आव्हान पेलण्यासाठी कोणती पावले उचलण्यात येत आहेत व येत्या काळात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. राजभवन येथे आज सायंकाळी सात वाजता ही उच्चस्तरिय बैठक होणार आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव, पालिका आयुक्त, राज्याचे पोलीस महासंचालक आणि अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यपालांसोबत करोना स्थितीवर अशी ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here