सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नौटिकल इंजिनिरिंग ट्रेनिंग (सिफनेट)ची शाखा रत्नागिरीत सुरू करण्याची मागणी

0

◼️ भाजपचे सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी केंद्रीय मत्स्य मंत्री परशोत्तम रुपालाजी यांच्याकडे केली मागणी

रत्नागिरी : केंद्रीय मत्स्य मंत्रालयाची सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नौटिकल इंजिनिरिंग ट्रेनिंग (सिफनेट)ही मत्स्य व्यवसायासाठी वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असून सिफनेटची शाखा रत्नागिरीत सुरू करावी अशी मागणी दक्षिण रत्नागिरी भाजपाचे सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी आंध्रप्रदेश या तीन राज्यात असून पश्चिम किनारपट्टीवरील गुजरात, महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या चार राज्यात मोठी किनारपट्टी असूनही एक ही शाखा नाही. सिफनेटद्वारे पंधरा दिवसांच्या सर्टिफिकेट कोर्स पासून ते अगदी नाॅटिकल इंजिनिअरींग मधील चार वर्षांच्या पदवी पर्यंत चे अभ्यासक्रम शिकवले जातात. याचा फायदा येथील मच्छीमार तसेच अनेक तरुणांना होउ शकतो. स्किल डेव्हलपमेंट च्या अभ्यासक्रमांमूळे या व्यवसायात आधुनिक तंत्रद्यान येउन या व्यवसायात मोठी वाढ होउ शकते तसेच अनेकांना मर्चंट नेव्ही सारख्या क्षेत्रात रोजगार मिळू शकतात.या चार ही राज्यांना रत्नागिरी हे मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी सिफनेटची शाखा सुरू झाल्यास मच्छिमारांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्यवसाय विकसित होऊन मोठ्याप्रमाणात रोजगारात ही वाढ होईल असा विश्वास सचिन वहाळकर यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर गुजरात,गोवा व कर्नाटक या तिन्ही राज्यांतील मच्छिमार यांना उपयुक्त ठरणारी सिफनेटची संस्था रत्नागिरीत होण्या करीता केंद्रीय मत्स्यमंत्री परशोत्तम रूपालाजी यांना विनंती करुन विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन ही वहाळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
19:39 03-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here