कशेडी चेक पोस्ट येथे तपासणीतील निर्बंध पुन्हा कडक

रत्नागिरी : जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी चेक पोस्टवर चाकरमान्यांची तपासणी होत आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून कशेडी चेक पोस्टवरील तपासणीतील निर्बंध शिथिल करण्यात आले होते; परंतु, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाने निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. ई-पास नसलेल्या वाहनांना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येत आहे. प्रत्येकाची नोंदणी होत आहे. कशेडी चेक पोस्टवर केवळ नाव, पत्ता व संपर्क आदींची नोंदणी करून चाकरमान्यांना थेट गावी जाण्याची मुभा दिली होती; मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. तपासणीतील शिथिल निर्बंध पुन्हा कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ई-पास असलेल्यांनाच जिल्हा प्रवेश मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here