चिपळूण : ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे दि. ६ ते १४ मार्च या कालावधीत शिमगोत्सव होणार आहे.
यानिमित्त पारंपरिक सांस्कृतिक, धार्मिक विधी कार्यक्रम होणार असून, ग्रामदेवतेची पालखी होळी पूजा व प्रज्वलनानंतर चतुःसीमा घेण्यास प्रारंभ करणार आहे. दि. ६ रोजी सहाण भरणे, दि. ७ रोजी श्री देवी विंध्यवासिनी भेट, दि. ८ रोजी कराड रोड, खेर्डी दत्त मंदिर. दि. १० रोजी खेंड, उक्ताड व बाजार चव्हाटा सीमा कार्यक्रम होईल. दि. ११ रोजी पाग, खेंड व श्री महालक्ष्मी भेट होईल. दि. १२ रोजी श्री कालभैरव लळीत व रंगपंचमी तर रात्री चव्हाटा कार्यक्रम होईल. दि. १३ रोजी पागझरी व पवार आळी सीमा भेट होईल, दि. १३ रोजी रात्री ११ वा. श्री केदारेश्वर मंदिर वैश्य वसाहत चिपळूण येथे रात्री ११ वा. ‘रंग मराठी ढंग मराठी’ हा लावण्यांचा कार्यक्रम होईल. दि. १४ रोजी लळीताचा कार्यक्रम होईल.
संपूर्ण शहरात जुना क़ालभैरवाची पालखी फिरणार असून रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणार आहे. दोन्ही बाजूच्या भाविकांनी दोन्ही बाजूने पूजा करावी व शिमगोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन कुंदन खातू, किशोर शेट्ये, समीर शेट्ये यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 04-03-2023