फेसबुकवर रील्स बनवणाऱ्यासाठी मोठी बातमी: व्हिडिओ ची वाढवली कालमर्यादा

0

नवी दिल्ली : मार्क झुकेरबर्गची मालकी असलेलं फेसबुक हे जगभरात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप आहे. आता मेटा ने फेसबुकवर वापरकर्त्यांसाठी काही नवीन ‘क्रिएटिव्ह एक्सप्रेशन’ फीचर्स लाँच केले आहे. नवीन फीचर्स आणल्यानंतर फेसबुकवर रील्स बनवणाऱ्याना आणखी फायदा होणार आहेत. आपल्या युजरसाठी मेटाने नुकतीच एक घोषणा केली आहे की, फेसबूक रिल्सच्या सेंकद वाढवण्यात आली आहे. फेसबुकने रीलची कालमर्यादा वाढवली आहे. रील्स क्रिएटर आता फेसबुक वर 90 सेकंदाचे व्हिडिओ तयार करु शकतात.

पूर्वी, यूजर्संना फेसबुक वर रील्स तयार करण्यासाठी फक्त 60 सेकंद मिळायचे. कंपनीने मेटा फॉर क्रिएटर्स अकाऊंटद्वारे या प्रमुख अपडेटची घोषणा केली. वेळेची मर्यादा वाढल्याने क्रिएटर्सना आणखी एक मोठे फिचर्स मिळाले आहे. आता क्रिएटर्स त्यांच्या फोनच्या मेमरीमधून सहजपणे रील्स तयार करु शकतात. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये एखादा व्हिडिओ सेव्ह केला असेल, तर तो रील्स वरही अपलोड केला जाऊ शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:27 04-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here