संगमेश्वरात २४ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल

देवरूख : शासनाने मुंबई व पुणे या शहरात अडकलेल्यांना गावी येण्याची मुभा दिली. याचा फायदा घेत संगमेश्वर तालुक्यात तब्बल २४ हजार ९११ चाकरमानी दाखल झाले आहेत. या चाकरमान्यांच्या येण्याने आरोग्य व महसूल विभागाची पुरती तारांबळ उडाली आहे. खासगी वाहनांनी या चाकरमान्यांनी तालुक्यात प्रवेश केला आहे. या चाकरमान्यांमुळे कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या तालुक्यात १ हजार ६४८ होम क्वारंटाईन, तर शाळा व विलगीकरण अशा ठिकाणी ५६३ जणांना ठेवण्यात आले आहे. अजूनही तालुक्यात चाकरमानी येण्याचा ओघ सुरूच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here