बारावी पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

0

मुंबई : बारावी परीक्षेदरम्यान बुलढाण्यात पेपरफुटीसाठी व्हॉट्सॲपचा वापर केल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही तपासात समोर येत आहे.

या प्रकरणात दोन शिक्षकांसह आजूबाजूच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यावर कलम ४२० आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पेपरफुटी प्रकरणातला मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांना सापडला नसून त्याचा तपास सुरू आहे.

दरम्यान बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये गणित पेपरचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये १० वाजून १७ मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 07-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here