अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन

मुंबई : कोरोनाग्रस्तांना उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली, तरी त्याला अॅनिमिया किंवा तत्सम आजार असल्यास रक्ताची आवश्यकता भासू शकते, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले. ते कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील रक्त पुरवठा, पीपीई किट्स, मास्क यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी ब्लड बॅंक आणि पीपीई किट्स-मास्क उत्पादक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन, संपूर्ण सुरक्षितता बाळगून, फक्त कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते. त्यामुळे सोसायट्या, सामाजिक संस्था यांनीही रक्तदान शिबिरं घ्यावी’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here