दादरमध्ये शनिवारी कोकणवासीयांचा मेळावा

0

मुंबई : रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न तसेच ‘कोकणच्या विकासाची दिशा’ या विषयी चर्चा करण्यासाठी शनिवार, 11 मार्चला संध्याकाळी 5 वाजता जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समिती यांच्या वतीने दादरमध्ये कोकणवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दादर पूर्व-नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्राध्यापक सुरेंद्र गावसकर सभागृहात हा मेळावा होणार आहे. मुंबई-गोवा रस्त्याचे काम गेली दहा वर्षे रखडलेले आहे. रखडलेल्या तसेच तांत्रिकदृष्टय़ा त्रुटी असलेल्या कामामुळे या रस्त्याने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे सगळी वाहतूक पुणे-कोल्हापूरमार्गे होत असल्यामुळे कोकणवासीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुळात बांधकामात त्रुटी असल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही अपघातांची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे ऑडिट करावे तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मेळाव्यात करण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी मोठय़ा संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जनता दलाचे प्रभाकर नारकर आणि कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 08-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here