श्रमिक ट्रेनमधून रत्नागिरी जिल्ह्यातून १५१; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०१३ कामगार आपल्या गावी रवाना

रत्नागिरी : कोरोना लॉकडाऊनच्या काळात विविध राज्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वेने श्रमिक गाड्यांचे नियोजन केले आहे. लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे गुरूवारी तिसरी श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेशातील जबलपूरकडे रवाना झाली. या तिसर्‍या श्रमिक ट्रेनमधून नोंदणी करून रितसर पास मिळवलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०१३ तर रत्नागिरी जिल्ह्यातून १५१ कामगार आपल्या गावी परतले आहेत. यावेळी प्रवाशांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व कामगार व मजुरांची रत्नागिरी रेल्वे स्थानकात वैद्यकीय तपासणी करुन पाण्याची बाटली, मास्क, साबण व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ९१० व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील १०३ व्यक्ती ५ पाच गाड्या अशा एकूण ५२ एस.टी बस मधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वााहतुकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:45 PM 21-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here