राम चंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती

0

राम चंद्र पौडेल नेपाळचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष चंद्र नेमबांग यांचा पराभव केला.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पौडेल यांना 33 हजार 802 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी सुभाष चंद्र नेम्बवांग यांना 15 हजार 518 मतांवर समाधान मानावे लागले.

नेपाळच्या राष्ट्रपतीपदासाठी गुरुवारी मतदान झाले होते. नेपाळ काँग्रेसकडून राम चंद्र पौडेल रिंगणात उतरले होते. तर सीपीएन यूएमएल पक्षाकडून सुभाष चंद्र नेमबांग मैदानात उतरले होते. गुरुवारी ल्होत्से हॉलमध्ये सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान पार पडले. निवडणूक आयोगानं मतदानासाठी दोन वेगवेगळे पोलिंग बूथ तयार केले होते, यामध्ये एक पोलिंग बूथ खासदारांसाठी होता तर दुसरा पोलिंग बूथ आमदारांसाठी होता. सर्व विधनासभा सदस्यांनीही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी काठमांडूमध्ये मतदान केले.

राम चंद्र पौडेल यांचं पारडे जड –
नेपाळ काँग्रेसचे उमेदवार राम चंद्र पौडेल यांचं या निवडणुकीत पारडे जड होतं. त्यांना आठ पक्षांचा पाठिंबा होता. त्याशिवाय सीपीएन-यूएमएल या पक्षाचे उमेदवार सुभाष चंद्र नेमबांग यांना पक्ष वगळता फक्त दोन अपक्षांचा पाठिंगा होता.

नेपाळच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये 884 सदस्य आहेत, त्यामध्ये 275 सदस्य लोकसभा आणि 59 राज्यसभेचे आहेत. तर 550 सात प्रांतीय विधानसभेचे सदस्य आहेत. कासदाराच्या एका मतांची किंमत 79 इतकी आहे. तर आमदारांच्या एका मताची किंमत 48 इतकी आहे. अशा पद्धतीने सर्व सदस्यांनी मते टाकली तर इलेक्टोरल कॉलेजची एकूण मते 52,786 इतकी होतात. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते पडतात, तो उमेदवार विजयी होतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 09-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here