जेसीआय दापोलीतर्फे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

दापोली : विविध क्षेत्रांत स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून कुटुंब आणि समाज तसेच राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या आणि कुठल्याही परिस्थितीला निर्धाराने समोरे जाऊन स्वत:चे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या नारी शक्ती दापोलीत धावताना दिसल्या.

जेसीआय दापोली व द फर्न समाली रिसॉर्ट, दापोली तसेच उपजिल्हा रुग्णालय, दापोली यांच्या सहयोगाने महिला दिनाचे औचित्त्य साधत हा योग जुळून आला. दापोलीतील महिला, विद्यार्थिनी व युवतींसाठी एक अनोखी आणि पहिल्यांदाच दापोलीत महिलांसाठी खास मिनी मॅरेथॉन स्पर्धो आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल 148 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या मॅरेथॉन स्पर्धेत वैद्यकीय क्षेत्र व्यवसायातील महिला वैदयकीय अधिकारी, महिला वैदयकीय व्यावसायिक, गृहिणी, उद्योजिका, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, युवती, अकॅडमीचे स्पर्धक इत्यादींनी आपला सहभाग नोंदवला. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील, नगराध्यक्षा ममता मोरे, जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ. सुयोग भागवत, सचिव जेसी. फराज रखांगे, पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक यादव , द फर्न समाली रिसॉर्टचे मुख्य व्यवस्थापक दिनेश यादव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. केशव जाधव, परिचारिका श्रीमती क्षीरसागर, डॉ. प्रतिक्षा भागवत, डॉ. तुषार भागवत, डॉ. कौस्तुभ रानडे, उद्योजिका कविता मालू , सीताफुले कार्यक्रम प्रमुख जेसी. अभिषेक खटावकर आदी मान्यवर स्पर्धेनिमित्त उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणासाठी, शारीरिक तंदुरुस्तीसाठी या शीथॉन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्पर्धक आझाद मैदान येथून नॅशनल हायस्कूल, रसिक रंजन नाट्यागृह, गुडलक स्टोअर्स, एसटी स्टँड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आझाद मैदान दरम्यान या स्पर्धेक धावले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिल्पा केंबळे , द्वितीय क्रमांक संजना हरावडे, तृतीय क्रमांक स्नेहा भाटकर, उत्तेजनार्थ राखी थोरे, विद्या मुलुख यांनी घोषित करण्यात आला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, स्पर्धा कुठलीही असो ती स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने त्या स्पर्धेत उतरले पाहिजे. या स्पर्धेमुळे महिलांप्रती असलेला आदरभाव आणि सन्मान व्यक्त झाला तसेच महिलांना प्रोत्साहन मिळेल. भविष्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी, बळकटीकरणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबविले जावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 10-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here