राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, माजी मंत्र्‍याची मागणी

0

राज्यात पूराचे भीषण संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेसह राज्यातील सर्व निवडणूका पुढील एक वर्षासाठी पुढे ढकलाव्या आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रणजीत देशमुख यांनी केली आहे.

राज्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. गेल्या काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी हानी झाली आहे. पूरग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणूका आणि पुनर्वसन एकाचवेळी शक्य नाही. त्यामुळे निवडणूका पुढे ढकलाव्यात. अशी मागणी त्यांनी केली. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबईसह राज्याच्या अन्य भागातही पुरामुळे हानी झालेली आहे. विदर्भासह अन्य जिल्ह्यांनाही पूराचा फटका बसला आहे. विधानसभा निवडणूकीसोबतच पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे शक्य होणार नाही. असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here