ली शियांग चीनचे नवे पंतप्रधान

0

ली शियांग चीनचे नवे पंतप्रधान बनले आहेत.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय ली शियांग हे चीनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. शुक्रवारी शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. चीनच्या सत्तेत मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यातच आता चीनला नवे पंतप्रधान मिळाले आहेत.

ली शियांग चीनचे नवे पंतप्रधान
झेजियांगचे गव्हर्नर आणि शांघायचे पक्षप्रमुख असलेले ली शियांग हे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. ली शियांग हे चीनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. ली झियांग यांची प्रतिमा व्यावसायिक आणि राजकारणी अशी आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चिनी संसदेच्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या बैठकीत त्यांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत होतं. चीनमध्ये सुरू असलेल्या द्वि-अधिवेशनात ली शियांग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी
शी जिनपिंग यांनी तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली आहे. यासोबत चीनमध्ये तिसर्यांदा सत्तेवर आल्याने जिनपिंग यांना आता चीनमधील आघाडीचं नेतृत्त्व मानलं जात आहे. माओ त्से तुंग यांच्यानंतर पहिल्यांदाच जिनपिंग तिसऱ्यांचा राष्ट्रपती बनले आहेत. त्यांच्या आधी माओ त्से तुंग यांनी सलग तिसर्यांदा देशाचे राष्ट्रपती म्हणून देशाच्या कारभाराची सूत्रं सांभाळली होती.

चीनवर जिनपिंग यांची सत्ता कायम राहणार?
दरम्यान, यानंतरही शी जिनपिंग चीनवर सत्ता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीपीसी काँग्रेसच्या काळात त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. दरम्यान, CPC ने आपल्या सर्व प्रमुख धोरणात्मक संस्थांसाठी त्यांना नवीन नेतृत्व म्हणून निवडलं आहे.

चीनमध्ये एकपक्षीय राजवट
चीनमध्ये एकपक्षीय राजवट आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. शी जिनपिंग यांची याआधीही दोन वेळा राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. आता शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 11-03-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here