कोरोनाचे संकट जगावर लादल्यामुळे चीनवर बहिष्कार टाकला पाहिजे : आठवले

मुंबई : चीन ने कोरोना महामारीबद्दल जगाला अनभिज्ञ ठेऊन धोका दिला. कोरोना साथीचा संसर्ग जगभर वाढण्यास चीन जबाबदार आहे. चीनमधील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण योग्यवेळी बंद करायला हवे होते मात्र कोरोनाच्या प्रसाराचा जगाला धोका होऊ नये याबाबत चीनने कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे चीनवर जगाने बहिष्कार घालून चीनला धडा शिकवला पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. चीनच्या वुहान मधून कोविड 19 हा विषाणू जगभर पसरला. कोरोनाच्या महामारीमुळे आजवर संपूर्ण जगात 3 लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पाहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर आता कोरोनाचे तिसरे जागतिक महायुद्ध सुरू असून यात जगातील 190 देश भरडले जात आहेत. जगावर कोरोनाचे संकट लादण्यास सर्वथा चीन जबाबदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर बहिष्कार घातला पाहिजे. दरम्यान, भारतात सह संपूर्ण जगाने चीनने उत्पादित केलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला धडा शिकवला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here